प्रभु श्रीराम हा शिवसेनेच्या आस्था आणि भावनेचा विषय आहे. आमच्यासाठी तो कधीच निवडणुकीचा मुद्दा नव्हता, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रविवारी होणाऱ्या अयोध्या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली राम मंदिर उभारले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राम मंदिराच्या मुद्यावर राऊत म्हणाले, मोदीजीच आमचे सुप्रीम कोर्ट
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम सांगितला. सकाळी ९ वाजता उद्धव ठाकरे हे अयोध्याला येतील. १० वाजता ते रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते लगेचच मुंबईला परतणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या सर्व विजयी खासदारांसह ठाकरे कुटुंबीयही उपस्थितीत असणार आहेत.
'३५० खासदार आहेत, राम मंदिरसाठी आणखी काय हवंय?'
संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. शहांच्या रुपात अनेक वर्षांनंतर देशाला एक मजबूत गृहमंत्री लाभल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करणे त्यांनी टाळले.
आदित्य ठाकरे हे युवा नेते असून राज्याचे नेतृत्व करण्यास ते सक्षम असल्याचेही ते म्हणाले.