पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमधील स्थिती सामान्य पण काँग्रेसची..., अमित शहा यांचे प्रत्युत्तर

अमित शहा

काश्मीरमधील परिस्थितीवरून लोकसभेतील चर्चेत उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले. यावेळी उपरोधिकपणे त्यांनी काँग्रेसवर टीका केली. अमित शहा म्हणाले, काश्मीरमधील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. पण मी काँग्रेसची स्थिती सामान्य करू शकत नाही. कलम ३७० रद्द केल्यावर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे भाकीत काँग्रेसने केले होते. पण तसे काहीच घडले नाही. काश्मीरमध्ये बंदुकीतून एक गोळीही झाडली गेली नाही, याकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले.

निर्भया प्रकरण: चारही आरोपींना फासावर लटकवले जाणार?

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीची माहिती सभागृहात दिली. काश्मीरमधील संचारबंदी मागे घेणे, तेथील शाळा पुन्हा सुरू करणे या सर्वांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. यानंतर काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी किशन रेड्डी यांना टोमणा मारताना काश्मीरमध्ये रामराज्यच असल्याचे म्हटले. काश्मीरमध्ये राजकीय नेत्यांना सातत्याने ताब्यात घेतले जाते आहे. यातूनच तेथील परिस्थिती सामान्य नाही हेच दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

... तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अमेरिकी आयोगाची मागणी

अधीर रंजन चौधरी यांच्या टिप्पणीला मग थेट अमित शहा यांनीच उत्तर दिले. ते म्हणाले, काश्मीरमध्ये ९९.५ टक्के विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा दिली. ही परिस्थिती काँग्रेससाठी सामान्य नाही. सात लाख रुग्णांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले, ही परिस्थिती काँग्रेससाठी सामान्य नाही. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राजकारण सुरू होईल, तेव्हाच तेथील परिस्थिती सामान्य झाली असे काँग्रेसला वाटते आहे, असे अमित शहा म्हणाले. काँग्रेसला सामान्य लोकांचे काहीच देणेघेणे पडलेले नाही, असेही ते म्हणाले.