पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामनवमी निमित्त पंतप्रधान मोदींचे टि्वट, म्हणाले, जय श्रीराम !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूच्या सावटाखाली देशभरात आज रामनवमी साजरी केली जात आहे. भलेही त्यासाठी नागरिक घराबाहेर पडत नसले तरी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी रामनवमीनिमित्त टि्वट केले आहे. पंतप्रधान मोदींनी टि्वट करुन 'जय श्रीराम' म्हटले आहे. तर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही टि्वट केले आहे. 

कोरोनावर लस निर्मितीसाठी DNA-RNA आधारित पद्धतीमुळे वेग

रामनवमीनिमित्त मोदी यांनी टि्वट करुन रामनवमीच्या पावन दिनी समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा, जय श्रीराम, असे टि्वट केले आहे. 

माजी क्रिकेटपटू लक्ष्मण यांनीही आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, मी प्रार्थना करतो की रामाच्या कृपमुळे या संकटाच्या काळातून आपण सुखरुप बाहेर निघू. जीवनात तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य आणि प्रेम मिळो.

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वस्तू द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

कोरोना विषाणूमुळे देशभरात सर्व छोटे-मोठे मंदिर बंद आहेत. त्यामुळे राम नवमीनिमित्त नेहमीसारखी प्रसन्नता दिसत नाही. सरकार आणि डॉक्टर कोरोना विषाणूपासून बचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन ते करत आहेत. अशावेळी त्यांच्या आवाहनास साद देत नागरिकांनाही घराबाहेर न पडता सुरक्षित राहिले पाहिजे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ram navmi 2020 pm narendra modi gives greetings to nation says jai shree ram coronavirus covid 19 outbreak