पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दशकांपासून सुरु असलेल्या प्रकरणाचा गोड शेवटः मोहन भागवत

मोहन भागवत (Photo by Mohd Zakir)

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. हे प्रकरण गेल्या अनेक दशकांपासून सुरु होते. त्याचा शेवट गोड झाला. याकडे कोणाचा विजय किंवा पराभव म्हणून पाहू नये. समाजात शांतता आणि सोहार्द टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो, असेही भागवत यांनी म्हटले. 

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मोहन भागवत यांनी संघाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण केले. या निकालाचा आनंद संयमाने आणि सात्विक पद्धतीने व्यक्त करण्याचे आवाहन केले. 

ते पुढे म्हणाले, भूतकाळ विसरुन राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपल्या कर्तव्याचे पालन करु. जय-पराजय म्हणून या निकालाकडे पाहू नये. न्यायालयाने मशिदीच्या उभारणीबाबत जे सांगितले आहे. ती जमीन सरकारला द्यायची आहे. आता त्यांना कुठे जमीन द्यायची हे सरकार निश्चित करेल. ज्याप्रमाणे न्यायालयाचा निकाल स्पष्ट होता. त्याप्रमाणेच माझेही वक्तव्य स्पष्ट असल्याचेही त्यांनी म्हटले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ram Janmabhoomi Babri Masjid title suit Ayodhya judgement RSS Chief Mohan Bhagwat says this is right decision