पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादः त्वरीत सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादातील मूळ याचिकाकर्त्यांपैकी एकाने या प्रकरणाची त्वरीत सुनावणी करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

सर्वोच्च न्यायालयात मे महिन्यात या वादावर सर्वमान्या तोडगा काढण्यासाठी निवृत्त न्यायाधीश एफ एम आय कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक मध्यस्थता समितीची स्थापना केली. या समितीचा कार्यकाळ हा १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला होता. त्यांना न्या. कलिफुल्ला समितीचा अहवाल मिळाला असून यावर कार्यवाही करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची वेळ देण्याची विनंती केली आहे, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने म्हटले होते.