पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मृत्यूशी झुंज देणाऱ्या अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची मागितली माफी

अमर सिंह आणि अमिताभ बच्चन

समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांनी महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे. बच्चन कुटुंबियांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावरुन भावुक होत त्यांनी माफी मागितली आहे. अमिर सिंह यांनी मंगळवारी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'या क्षणी मी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. मी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागतो.

शीना बोरा प्रकरणात देवेन भारतींनी महत्त्वाची माहिती लपवली:राकेश मारिया

अमर सिंह यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी मला अमिताभ बच्चन यांचा मॅसेज मिळाला. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मी जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. तेव्हा अमिताभजी आणि त्यांच्या कुटुंबियांविरूद्ध केलेल्या टीकेबद्दल मला वाईट वाटते. मी त्यांची माफी मागतो. देव सर्वांना आशीर्वाद देवो.'

'पुरोगामी, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव'

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अमर सिंह यांना त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त मॅसेज पाठवला. त्यानंतर अमर सिंह यांनी आपल्या वक्तव्यावरुन दु:ख व्यक्त केले. सध्या अमर सिंह किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. अमर सिंह यांच्यावर सिंगापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन आणि अमर सिंह हे खूप चांगले आणि जुने मित्र होते. मात्र त्यांची मैत्री तुटल्यानंतर अमर सिंह हे अमिताभ बच्चन यांच्यावर टीका करु लागले. 

Video : मास्टर ब्लास्टर सचिन ठरला लॉरियस पुरस्काराचा मानकरी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rajya sabha mp amar singh ends feud with amitabh bachchan says regret my overreaction against him