पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेतील मार्शलच्या गणवेशावरून नवा वाद, व्यंकय्या नायडूंचे फेरविचाराचे आदेश

राज्यसभेतील मार्शलचे नवे गणवेश

राज्यसभेतील मार्शलना देण्यात आलेल्या नव्या गणवेशावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नव्या गणवेशाचा फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसभेच्या २५० व्या सत्राला सोमवारी सुरुवात झाली. त्यावेळी राज्यसभेतील मार्शल नव्या गणवेशात दिसले होते. हा गणवेश लष्करी पद्धतीचा आहे. त्यामुळेच त्याच्यावर आक्षेप घेतला जातो आहे.

दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

लष्कराचे माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लष्कराच्या गणवेशाची कॉपी करून त्या पद्धतीचे गणवेश नागरी स्वरुपाची कामे करणाऱ्या लोकांनी घालणे बेकायदा आहे. यामुळे सुरक्षिततेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात. या प्रकरणी संबंधित लोक लवकर योग्य तो निर्णय घेतील अशी मला आशा आहे. 

रामदास आठवलेंनी शिवसेनेचे टेन्शन घेऊ नये, संजय राऊतांचा टोला

मार्शलसाठी आधी पांढऱ्या रंगाचा फेटा आणि सफारी अशा स्वरुपाचा गणवेश होता. त्यामध्ये पूर्णपणे नव्याने बदल करण्यात आला आहे. नवा गणवेश हा लष्करी स्वरुपाचा आहे. त्यामुळेच त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी सोमवारीच हा मुद्दा उपस्थित केला होता. पण व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेतील निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असल्यामुळे जयराम रमेश यांना याबद्दल नंतर आपले मत मांडण्यास सांगितले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rajya Sabha chairman Venkaiah Naidu orders review of new military style uniform of marshals