पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताला मिळणार पहिलं राफेल विमान

भारताला मिळणार पहिलं राफेल विमान

गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भारताला मिळणार आहे. फ्रान्समध्ये आज औपचारिकपणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राफेल विमान भारतीय वायू दलाच्या ताफ्यात सहभागी होणार आहे. 

तालिबानने ११ दहशतवाद्यांच्या बदल्यात ३ भारतीय अभियंत्यांना सोडले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भारतीय पंरपरेनुसार राफेल विमानांचं शस्त्रपूजनही करणार असल्याचं समजत आहे. भारतीय हवाई दलाचा ८७ वा वर्धापन दिन आणि आणि दसऱ्याचा शुभमुहूर्त साधत आज फ्रान्सकडून पहिले विमान वायूदलाच्या ताफ्यात येणार आहेत. राफेल भारताकडे सुपूर्द करण्याचा औपचारिक कार्यक्रम दस्साँ एव्हिएशन कंपनीच्या कारखान्यात होणार आहे. फ्रान्स वैमानिक राफेलच उड्डाण भरतली तर यावेळी राजनाथ सिंह सोबत कॉकपिटमध्ये असतील अशी माहिती समजत आहे. 

काश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय

सुरुवातीला फ्रान्स वैमानिक हे विमान चालवतील, भारतीय वैमानिकांना हे लढाऊ विमान चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे, अशी माहिती हवाई दलाच्या सुत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली. 

सप्टेंबर २०२२ पर्यंत सर्व ३६ विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येणार आहेत. २३ सप्टेंबर २०१६ फ्रान्सशी केलेल्या करारानुसार ५९ हजार कोटी रुपयांना भारताने ३६ राफेल विमानांची खरेदी केली होती. याच विमानांच्या खरेदी करारावरून लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

एनआरसीतून बाहेर गेलेल्या लोकांबाबत सरकारचे नियोजन काय?- चिदंबरम