पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाकमधून आलेला दहशतवादी परत जाणार नाही'

राजनाथ सिंह

भाजप सरकारने जम्मू काश्मीरला कॅन्सरमुक्त केले, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी  कलम ३७० च्या मुद्यावर भाष्य केले. ते बिहारमधील पाटणामधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचेही कान टोचले आहे. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. 

निवडणुकीनंतरही राज्यात पुन्हा 'देवेंद्र'च, अमित शहांचे

भविष्यात पाकिस्तानसोबत चर्चा झालीच तर ती पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातच होईल, असे विधानही त्यांनी पुन्हा एकदा केले. पाकिस्तानने १९६५ आणि १९९७ सारखी चूक केली तर त्यांची गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. पाकिस्तानमधून कितीही दहशतवादी येऊ देत. मात्र ते परत जाणार नाहीत, असा दमही त्यांनी पाकिस्तानला भरला.
जम्मू काश्मीरमधील कमल ३७० बद्दल ते म्हणाले की, काश्मीर खोऱ्यातील तीन चतुर्थांश जनता ही या ऐतिहासिक निर्णयामध्ये सरकारच्या बाजूने होती, असा दावाही त्यांनी यावेळी केला.  

कुछ भी हो, न हो, हमारी जीत पक्की हैः अमित शहा

ते पुढे म्हणाले की, कलम ३७० हटवणे काश्मीरच्या जनतेचेही स्वप्न होते. आम्ही स्वप्न पाहिले होते पण ते वास्तवात आले नाही, अशी तिथल्या जनतेची भावना होती. सरकारने उघड्या डोळ्यांनी हे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.