पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजनाथ सिंह यांचा पाक पंतप्रधानांना सल्ला

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सल्ला दिला आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दहशतवादा विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. जर तुम्ही दहशतवादा विरोधात लढा देण्याचा गांभिर्याने विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला हवी ती मदत करु, असे त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना उद्देशून म्हटले आहे. ते कर्नालमधील एका प्रचारसभेत बोलत होते.    

'PMC बँक घोटाळ्यात कुणाचे नातेवाईक? मोदींनी उत्तर द्यावे'

राजनाथ सिंह म्हणाले की, जर पाक दहशतवाद्यांविरोधात गांभिर्याने कारवाई करण्याचे पाऊल उचलत असेल तर भारत त्यांना पूर्ण सहकार्य करेल. गरज पडल्यास भारतीय लष्करही त्यांच्या मदतीला पाठवण्याचा विचार करु. इम्रान खान यांच्या भाषणाचा दाखला देत ते म्हणाले की, काश्मीरला स्वतंत्र मिळवून देईपर्यंत भारत-पाक युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलत राहू असा उल्लेखही त्यांनी केला. पण त्यांनी आता काश्मीरचा मुद्दा विसरुन जायला हवा.

शिरुरमध्ये अमित शहांचा रोड शो, प्रचंड गर्दी

आमच्यावर (भारतावर) यासंदर्भात कोणीही दबाव टाकू शकत नाही. १९४७ मधील फाळणीनंतर १९७१ मध्ये पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे झाले. पाकिस्तानमध्ये अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा पाकिस्तानचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, अशी  भविष्यवाणी देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी केली.