पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर तुमचे कधी होते?, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला टोला

राजनाथ सिंह

काश्मीर प्रश्नावर बोलण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात पाकिस्तान विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत असला, तरी त्याला फारसे यश मिळणार नाही. कोणताच देश पाकिस्तानच्या पाठिशी उभा राहणार नाही, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 

कच्छमध्ये पाकिस्तानी कमांडोंची घुसखोरी; गुजरातमध्ये हाय अलर्ट

जम्मू-काश्मीरमधून लडाखचे विभाजन करण्यात आल्यानंतर आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच राजनाथ सिंह लडाखमध्ये आले आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवाया पूर्णपणे संपत नाहीत, तोपर्यंत त्या देशाशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चिदंबरम यांना अटक ही तर आनंदाची बातमी - इंद्राणी मुखर्जी

राजनाथ सिंह म्हणाले, मला पाकिस्तानला असा प्रश्न विचारायचा आहे की काश्मीर कधी तुमचे होते. काश्मीर हा कायमच भारताचा अविभाज्य घटक राहिला आहे. त्यामुळे या प्रश्नावर कोणतीही भूमिका घेण्याचा पाकिस्तानला अधिकारच नाही. उलट पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील अत्याचार आणि मानवी अधिकारांचे होणारे उल्लंघन रोखण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला.