पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजीव गांधी हत्या प्रकरण : नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर

नलिनी

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयानं तिचा पॅरोल मंजूर केला आहे. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी तिला पॅरोल देण्यात आल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येसाठी नलिनीला दोषी ठरवण्यात आलं होतं. तिला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र  २००० साली तिची फाशीची शिक्षा माफ करण्यात आली. त्यानंतर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

तिला शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयानं ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. मे १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं. गेल्या २७ वर्षांपासून ती तुरूंगात आहे.