पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA आंदोलनाविरोधातील ट्विटमुळे रजनीकांत वादात, द्रमुकची कडाडून टीका

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत

सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात देशभरात संतापाचं लोण पसरलं आहे. ठिकठिकाणी  निदर्शनं करत या कायद्याला नागरिकांसह अनेक बडे राजकारणी, सेलिब्रिटींनी विरोध दर्शवला आहे.  अशातच गुरुवारी रात्री उशीरा रजनीकांत यांनी केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर मोठा वाद झालेला पहायला मिळत आहे. 

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात तिघांचा मृत्यू,

हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, असं रजनीकांत  यांनी म्हटलं आहे. सुधारित नागरिकत्त्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी या दोन मुख्य वादावर रजनीकांत यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.  'देशाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी  भारतीय नागरिकांनी एकत्र यायला पाहिजे. सध्या देशात यावरून जो हिंसाचार सुरु आहे त्यामुळे मला अतीव दु:ख झालं आहे', असं रजनिकांत म्हणाले. रजनीकांत यांच्या ट्विटनंतर अल्पावधित ट्विटरवर मोठा वाद सुरु झाला. रात्रीपासून #IStandWithRajinikanth आणि #ShameOnYouSanghiRajini हे दोन हॅशटॅग वापरून लोकांनी आपलं  मत व्यक्त केलं आहे. ट्विटवर दोन गट  पडलेले पहायला मिळाले आहेत. 

सरकार भारताचा आवाज दाबू शकत नाही : राहुल गांधी

तर तामिळनाडू राज्यातील विरोधी पक्ष द्रमुकच्या युवा आघाडीचे अध्यक्ष उदयनिधी स्टॅलिन यांनी रजनीकांत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात द्रमुकपक्षानं २३ डिसेंबरला रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन स्टॅलिन यांनी केलं आहे मात्र, या रॅलीत सहभागी होताना काही गर्भश्रीमंत ज्येष्ठ व्यक्तींना त्यांच्या घरात सुरक्षित राहू द्या कारण नागरिकांचे मुलभूत हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आपण चुकीच्या गोष्टीला केलेला विरोध हा त्यांना हिंसाचार वाटत आहे, अशी कडाडून टीका त्यांनी रजनीकांत यांच्यावर केली आहे. 

मराठा आरक्षण सुनावणी : वकील बदलले नाहीत, सरकारचा खुलासा