पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचे टि्वट, रेल्वे थांबवली

राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेची तपासणी करण्यात आली

दिल्लीवरुन दिब्रूगडला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यामुळे ही रेल्वे आज सायंकाळी दादरी (नोएडा) येथे रोखण्यात आली. एका प्रवाशाने रेल्वेत ५ बॉम्ब असल्याचा दावा केला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल अलर्टवर आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्वरीत पुढचे पाऊल उचलण्यात आले. विशेष म्हणजे एका व्यक्तीने राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती टि्वट करुन दिली.

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण धोक्यातः फडणवीस

संजीवकुमार गुर्जर नावाच्या व्यक्तीने राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती टि्वट करुन दिली.

संजीवकुमार गुर्जर असे टि्वट केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, दिल्लीहून कानपूरला जात असलेली राजधान एक्स्प्रेसमध्ये (१२४२४) पाच बॉम्ब आहेत. यावर त्वरीत कारवाई करा, असे टि्वट संजीवकुमारने केले. त्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, दिल्ली पोलिस आणि आयआरसीटीसीला टॅग केले होते. या टि्वटनंतर त्वरीत सुरक्षादलांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. 

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर ४.७ टक्के

टि्वटवर उत्तर देताना आग्रा रेल्वे पोलिसांच्या अधीक्षकांनी ते रिट्विट केले. दिलेल्या माहितीनुसार सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहे. रेल्वेला जीआरपी दादरी पोस्टवर थांबवण्यात आली आहे. आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तरित्या रेल्वेची तपासणी करत आहेत. 

दिल्लीहून दिब्रूगडला जाणारी राजधानी सायंकाळी ४.१० वाजता ती प्रस्थान करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता दिब्रूगड येथे पोहोचते.