पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कारगिल युद्धातील हिरो मिग-२७ आज निवृत्त

कारगिल युद्धातील हिरो मिग-२७ आज निवृत्त

भारतीय हवाईदलात १९८५ मध्ये सामील झालेले मिग-२७ लढाऊ विमान आज निवृत्त होत आहे. गेल्या तीन दशकांपासून भारतीय हवाईदलाच्या अनेक महत्त्वाच्या अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणारे मिग-२७ आज अखेरचे उड्डाण करणार आहे. जोधपूर एअरबेसवरुन उड्डाणानंतर अखेरच्या स्क्वॉड्रनच्या ७ लढाऊ विमानांना निरोप दिला जाईल. 

भारतातच तयार करण्यात आलेले १६५ मिग-२७ विमानांचा १९८५ मध्ये हवाईदलात समावेश करण्यात आला होता. याचा सर्वाधिक वापर हा कारगिल युद्धादरम्यान करण्यात आला होता. पाकिस्तानबरोबर १९९९ मध्ये झालेल्या युद्धात मिग-२७ फायटर जेट्सने महत्त्वाची भूमिका निभावली होती. शक्तिशाली आर-२९ इंजिनच्या मदतीने हे लढाऊ विमान कमी उंचीवरुन मोठ्या वेगाने उड्डाण करु शकते.

अयोध्या निकाल : बाबरी मशीद कृती समिती पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता

संरक्षण मंत्रालयाने मिग-२७ बाबत म्हटले की, या विमानांनी युद्ध काळ असो किंवा शांततेच्या काळात भारतासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कारगिलच्या ऐतिहासिक युद्धात या विमानाचे महत्त्वाचे योगदान होते. त्यावेळी या विमानांनी शत्रूंच्या ठिकाणांवर अचूक हल्ला केला होता. त्याचबरोबर ऑपरेशन पराक्रममध्येही मिग-२७ ची महत्त्वाची भूमिका होती. 

सर्वांनाच हिंदू म्हणणे अयोग्य, भागवतांच्या विधानाशी आठवले असहमत

मिग-२७ चे जुन्या व्हर्जनची सेवा या आधीच बंद करण्यात आली आहे. सध्या २००६ चे अपडेटेड मिग-२७ व्हर्जन हवाईदलाच्या सेवेत होते. आता या ऐवजी भारतीय हवाईदलाने मिग-२१ लढाऊ विमानांचा वापर सुरु केला आहे.

आधी उधारी चुकवा, मगच तिकीट मिळेल; सरकारी संस्थांना Air Indiaचा दणका

मिग-२७ ने कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका निभावली असली तरी गेल्या काही वर्षांपासून या विमानांचे अनेक अपघातही झाले आहेत. इतकेच काय तर मिग-२७ हे अपघातासाठीच ओळखले जाऊ लागले होते. पश्चिम देशात तयार करण्यात आलेल्या लढाऊ विमानांच्या तुलनेत ते खूप असुरक्षित मानले जात होते. भारतीय हवाईदलाने १० टक्के मिग-२७ अपघातात गमावले आहेत.

धक्कादायक: ग्रहणकाळात तीन विशेष मुलांना जमिनीत पुरले