पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानात १०४ बालकांचा मृत्यू; विशेष तज्ज्ञांचे पथक करणार तपास

राजस्थान ज के लोन रुग्णालय

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील जे के लोन रुग्णालयात डिसेंबर महिन्यामध्ये १०४ बालकांचा मृत्यू झाला. बालकांच्या मृत्यू प्रकरणाची दखल केंद्र सरकारने घेतली असून याचा तपास करण्यासाठी तज्ज्ञाचे पथक कोटाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय पथक शुक्रवारी कोटा येथे येणार आहे. केंद्र सरकारने अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी राजस्थान सरकारला अतिरिक्त मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. 

 

काँग्रेस म्हणते, सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलिंगी संबंध

कोटाच्या जे के लोन रुग्णालयात बालकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण काही थांबायचे नाव घेत नाहीये. डिसेंबर महिन्यात तब्बल १०० बालकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकात जोधपूर एम्सचे तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य, वित्त आणि प्रादेशिक संचालक सहभागी असणार आहे. याशिवाय जयपूरमधील तज्ज्ञांचाही यात समावेश आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, त्यांचे याबाबत राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. केंद्र सरकारने राजस्थान सरकारला मुलांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

नाराजीबाबत माझे मत कायम; फडणवीसांच्या भेटीनंतर खडसेंची

जे के लोन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे राजकारण तापू लागले आहे. या मुद्द्यावरुन राजस्थान सरकारवर टीका केली जात आहे. बालाकांच्या मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत १०४ मुलांचा मृत्यू झाला आहे. या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ३ बाळांचा मृत्यू झाला तर गुरुवारी आणखी एका बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा केंद्राकडून तपास केला जाणार आहे. २०१४ मध्ये या रुग्णालयात १५ हजार ७१९ बालकांना दाखल केले गेले होते. त्यातील १ हजार १९८ बालकांचा मृत्यू झाला. तर २०१५ मध्ये १७ हजार ५७९ बालकांना दाखल करण्यात आले होते. त्यातील १ हजार २६० मुलांचा मृत्यू झाला होता. तर २०१८ आणि २०१९ मध्ये सुध्दा बालकांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. 

इंडिगोच्या विमानात दिसले झुरळ, प्रवाशांना भरपाई देण्याचे आदेश

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rajasthan child death case modi government sends high level team to visit jk lon hospital