पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थान BJP अध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन

मदनलाल सैनी

राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे सोमवारी निधन झाले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ७५ वर्षीय सैनी यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मदनलाल सैनी राज्यसभा खासदार देखील होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मदनलाल सैनी यांच्या जाणे भाजप परिवारासाठी मोठे नुकसान आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राजस्थानमध्ये पक्षाचा विस्तार करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या सोबत आहे, असा उल्लेख मोदींनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.  

राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनाचे वृत्त हैराण करणारे होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी आहे, असे ट्विट कहलोत यांनी केले आहे.