पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानमध्ये मायावतींना झटका; ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मायावती आणि अशोक गहलोत

राजस्थानमध्ये मायावतींना मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्व सहा आमदारांनी बसपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे सर्व आमदार आतापर्यंत सत्ताधारी काँग्रेसला बाहेरुन समर्थन देत होते. त्यांनी सोमवारी रात्री साडेदहा वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

भारत-पाकमधील तणाव कमी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना भेटणार: ट्रम्प

बहुजन समाज पक्षाचे उदयपूरवाटी मतदार संघाचे आमदार राजेंद्र गुढा, नदबई मतदार संघाचे आमदार जोगेंद्र सिंह अवाना, नगर मतदार संघाचे आमदार वाजिब अली, करोली मतदार संघाचे आमदार लाखन सिंह मीणा, तिजारा विधासभा मतदार संघाचे आमदार संदीप यादव आणि आमदार दीपचंद खेरिया यांनी बसपाला राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये साजरा करणार जन्मदिवस

बसपा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेस सरकार आणखी मजबूत झाले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, बसपाचे सर्व आमदार गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या संपर्कात होते. दरम्यान, राजस्थानमध्ये २०० जागा असलेल्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे १०० आमदार आणि मित्र पक्ष राष्ट्रीय लोकदलाचा एक आमदार आहे. तर, सत्ताधारी काँग्रेसला १३ अपक्ष आमदारांपैकी १२ आमदारांचे बाहेरुन समर्थन मिळत होते. 

संभाजी भिडेंविरोधातील तपासाचा अवधी हायकोर्टाने वाढवला