पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानमध्ये मध्यान्ह भोजनातून ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा

राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा

राजस्थानमध्ये मध्यान्ह भोजनातून ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. भिलवाडा जिल्ह्यातल्या जाबरकिया या गावातील सरकारी शाळेमध्ये ही घटना घडली आहे. मध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जाबरकिया गावातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मंगळवारी मध्यान्ह भोजन देण्यात आले. भोजनामध्ये कढी-भात देण्यात आला होता. भोजन संपल्यानंतर हे विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये गेले. थोड्याच वेळात त्यामधील ३६ विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्याचा त्रास सुरु झाला. या विद्यार्थ्यांना तात्काळ गंगापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

१५ ऑगस्टपर्यंत अजित डोवाल यांचा काश्मीर खोऱ्यात 'मुक्काम'

दरम्यान, विद्यार्थ्यांना दुषित पाण्यापासून तयार केलेला कढी-भात दिला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. करोई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 

स्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण...