पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानमध्ये अपहरण करुन अल्पवयिन मुलीवर सामूहिक बलात्कार

राजस्थान बलात्कार प्रकरण

राजस्थानमध्ये अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पीडित मुलगी आपल्या दोन मित्रांसोबत मंदिरामध्ये जात होती. त्याचवेळी आरोपींनी तिचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

'ॐ'  आणि 'गाय' या शब्दांमुळे काहींना कापरे भरते : PM मोदी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी जयपूरपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या भीलवाडा जिल्ह्यात घडली आहे. पीडित मुलगी आपल्या मित्रांसोबत मंदिरामध्ये जात होती. त्याचवेळी रस्त्याच्याकडेला तिन्ही आरोपी दारु पित बसले होते. आरोपींनी पीडित मुलीला पाहताच तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिचे अपहरण करन निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन

यावेळी घाबरलेल्या पीडित मुलीच्या एका मित्राने पळत जाऊन गावातील एका व्यक्तीला सांगितले. त्यानंतर दोघेही गाडी घेऊन घटनास्थळी पोहचले त्यावेळी आरोपी पीडित मुलीला मारहाण करत होते. गाडी आलेली पाहताच आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीला दोघांनी घरी नेऊन सोडले. 

...म्हणून सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर' धोनीला समर्पित

दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यामधील दोन जणांचे वय २० वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची नावं राजू काहर आणि कैलाश काहर आहे. तर तिसऱ्या व्यक्तीचे नाव नारायण गुर्जर असून तो ४० वर्षाचा आहे. 

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट