पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थानमध्ये भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू, २० ते २५ जण जखमी

अपघातानंतर गाड्या हटविताना (फोटो - एएनआय)

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११ वर सोमवारी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बस आणि ट्रक हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अयोध्येच्या निकालात अनेक त्रुटी, यशवंत सिन्हा यांची टीका

खासगी बस आणि ट्रक यांच्यात ही धडक झाल्याची माहिती आहे. बसमधून ३० ते ३५ प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यावेळीच हा अपघात झाला. घटनास्थळी आता मोठा पोलिस बंदोबस्त असून, वाहने हटवून मार्ग पुन्हा सुरू करण्याचे काम करण्यात येत आहे.

११ नोव्हेंबरला बिकानेर जिल्ह्यातच झालेल्या एका रस्ता अपघातात सात प्रवासी मृत्युमुखी पडले होते.