पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळ-कर्नाटक पुरात १२५ जणांचा मृत्यू, अमित शहा करणार हवाई पाहणी

देशभरामध्ये पुरात १२५ जणांचा मृत्यू, अमित शहा करणार हवाई पाहणी

देशातील पश्चिम भागापासूत ते दक्षिणेपर्यंतच्या राज्यात पुराने हाहाकार उडाला आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. मदत आणि बचाव संस्थांच्या मते केरळमध्ये गुरुवारपर्यंत सर्वाधिक ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. आणखी काही दिवस पाऊस राहण्याच्या शक्यतेमुळे केरळ सरकारने लष्कराच्या बचाव पथकाच्या सहाय्याने पुरात फसलेल्या लोकांना एअर लिफ्ट करण्याचा आदेश दिला आहे. याचदरम्यान केरळमध्ये भूस्खलनात दबले गेलेल्या ९ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मलप्पुरम जिल्ह्यात ८ ऑगस्टला भूस्खलन झाले होते. 

यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. तटरक्षक दलाने आपल्या टि्वटमध्ये ३ राज्यांमध्ये फसलेल्या २२०० नागरिकांना वाचवल्याची माहिती दिली. कर्नाटकात किमान २४ लोकांचा मृत्यू झाल्याचे तर ९ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. राज्यात ६०० बचाव शिबीर सुरु केले आहेत. यामध्ये १,६१,१०० लोकांना स्थलांतरित केले आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rain eases in Kerala Home Minister Amit Shah to take aerial review of flooded areas of Karnataka