पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे खासगीकरणावर काय म्हणाले रेल्वे मंत्री..

पीयूष गोयल

रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चेदरम्यान रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मोठे वक्तव्य केले. त्यांनी रेल्वे भारत आणि भारतातील नागरिकांची संपत्ती असून पुढे ही ती राहिल, असे म्हणत रेल्वेच्या खासगीकरणाच्या शक्यता फेटाळल्या आहेत. सरकार रेल्वेचे खासगीकरण करणार नाही. उलट प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांकडून काही सेवांचे आऊटसोर्सिंग करत असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार टिकणार नाही

राज्यसभेच्या प्रश्नोत्तरादरम्यान उत्तर देताना पीयूष गोयल म्हणाले की, रेल्वे चालू ठेवण्यासाठी १२ वर्षांत अंदाजे ५० लाख कोटी रुपयांचा निधी सरकार एकट्याने जमा करु शकत नाही. त्यासाठी अशा पद्धतीचे पाऊल उचलण्यात आले आहे. वरच्या सभागृहात गोयल म्हणाले की, आमचा हेतू हा रेल्वेचे खासगीकरण करणे नसून प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि त्यांना फायदा पोहोचवणे आहे. भारतीय रेल्वे भारत आणि देशवासियांची संपत्ता असून ती पुढेही राहिल.

सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांचा पाठिंबा: जयंत पाटील

प्रवाशांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी नवीन रेल्वे आणि अधिक गुंतवणुकीचा उल्लेख करताना गोयल म्हणाले की, जर खासगी कंपन्या रेल्वेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील आणि सद्यस्थितीत चालवू इच्छित असतील तर त्याचा प्रवाशांना फायदाच होईल.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या उषा ढोरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Railway Minister gave the answer on the question of handing over the railway to the private sector