पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल यांनी राजीनामा दिल्यास ती राजकीय आत्महत्या ठरेलः लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव (PTI file photo)

पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वैफल्यग्रस्त झाले असून ते राजीनामा देण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आरजेडी सु्प्रिमो आणि सध्या कारागृहात असलेले लालूप्रसाद यादव यांनी राहुल यांना मोलाचा सल्ला दिला आहे. राहुल गांधींनी राजीनामा दिल्यास ती राजकीय आत्महत्या ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभेच्या ५४२ जागांपैकी अवघ्या ५२ जागांवर काँग्रेसला यश आलेले आहे. तर मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने ३५२ जागा मिळवल्या आहेत. 

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, पण काँग्रेस कार्यकारिणीची बैठक तूर्त नाही

राजीनामा देणे ही राहुल गांधी यांची राजकीय आत्महत्या ठरेल. भाजपला सत्तेपासून रोखणे हे विरोधकांचे सामायिक लक्ष्य होते. पण राष्ट्रीय स्तरावर ते प्रत्यक्षात उतरवता आले नाही. हा एका निवडणुकीचा निकाल आहे. यामुळे भारतासारख्या विविधता असलेल्या देशाचे वास्तव बदलू शकत नाही, असे लालूंनी म्हटल्याचे वृत्त 'टेलिग्राफ'ने आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा देणे म्हणजे भाजपच्या जाळ्यात अलगदपणे सापडण्यासारखे आहे. सर्वच विरोधकांनी संयुक्तपणे याची जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

राहुल गांधींनी पद सोडू नये, कार्यकर्ते आत्महत्या करतील; चिदंबरम यांचे भावनिक आवाहन

लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीचे नेतृत्व सध्या त्यांचा मुलगा तेजस्वी यादव करत आहे. यंदाच्या निवडणुकीत आरजेडीला खातेही उघडता आले नाही. आरजेडीने १९ जागा लढवल्या होत्या. त्यांनी काँग्रेससह इतर पक्षांबरोबर आघाडी केली होती.