पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉग स्क्वॉड यूनिटचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी म्हटले 'न्यू इंडिया'

डॉग स्क्वॉड यूनिटचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी म्हटले 'न्यू इंडिया' (Twitter/@RahulGandhi)

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज (शुक्रवार) देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रांची येथील कार्यक्रमात हजेरी लावली. सामान्यांपासून विशेष व्यक्तींनीही योग करतानाची छायाचित्रे समोर आली. यातील लष्कराच्या श्वान पथकाचा (डॉग यूनिट) योग करतानाच्या छायाचित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या छायाचित्रात स्नायपर श्वानही योग करताना दिसत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हेच छायाचित्र टि्वटरवर शेर करत त्याला 'न्यू इंडिया' असे कॅप्शन दिले. या टि्वटमुळे राहुल चांगलेच ट्रोल झाले आहेत.

पंतप्रधान मोदी हे निवडणून प्रचारावेळी आपल्या भाषणात 'न्यू इंडिया'चा उल्लेख करत आले आहेत. बदलत्या भारताबद्दल त्यांचे हे वक्तव्य होते. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या 'न्यू इंडिया'वरुन यापूर्वीही टीका केली आहे. आजही त्यांनी लष्कराच्या डॉग स्क्वॉडच्या छायाचित्रावर 'न्यू इंडिया' लिहिले. त्यामुळे अनेकांना त्यांचे हे टि्वट आवडले नसल्याचे दिसत आहे. काहींनी त्यांना अशाप्रकारचे टि्वट न करण्याचा त्यांना सल्ला दिला आहे.

सारवर्ता नावाच्या एक महिलेने दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा शीर्षासन करतानाचे छायाचित्र शेअर करत लिहिले की, हे टि्वट करण्याची गरज नव्हती. तुम्ही हे छायाचित्र शेअर करु शकला असता.

तर एकाने कृपया श्वानांची याप्रकारे खिल्ली उडवू नका असे म्हटले.