पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'संपूर्ण देशात विरोधकांची लाट'

राजद नेते तेजस्वी यादव

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख अवघ्या आठवड्याभरावर असताना  राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडी सत्ता स्थापन करेल करेल, असा दावा केला. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी महाआघाडीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुख्य भुमिका असेल, असेही म्हटले आहे. 

भारतीय जनता पार्टीने (भाजप) जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. 'अच्छे दिन', 'काळा पैसा' आणि 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अशा सर्वच स्तरावर भाजप अपयशी ठरले. आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी भाजप द्वेष पसरत राजकीय पोळी भाजत आहे, असा आरोप तेजस्वी यांनी केला. 

'ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून चावी फिरवली की अर्थव्यवस्था चालू'

यादव यांची पार्टी राजद बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय लोक समदा पार्टी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा या घटक पक्षासह निवडणूक लढवत आहे. या महाआघाडीला राज्यात मोठ यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की,  ''उत्तर प्रदेश आणि बिहारची केंद्रात सत्ता स्थापनेसाठी मुख्य भूमिका राहिली आहे. ती कायम असेल. संपूर्ण देशात विरोधकांची लाट आहे, यावेळी राहुल गांधीविषयी ते म्हणाले की," काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली परिपक्वता दाखवून दिली आहे. त्यांचे मनोबल उंचावले आहे. नव्या महाआघडीत त्यांची प्रमुख भुमिका असेल."

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rahul gandhis role will be central role in the formation of new government says tejaswi yadav