पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियंका गांधीच्या अटकेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; हा सत्तेचा दुरुपयोग

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सोनभद्र येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यामुळे राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. हा तर सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज सोनभद्र येथे पीडीत कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या त्यांना मिर्झापूर येथे अडवण्यात आले. याविरोधात प्रियंका गांधी या धरणे आंदोलनाला बसल्या असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सोनभद्र गोळीबार प्रकरण: प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जाण्यापासून प्रियंका गांधी यांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेणे हे अस्वस्थ करणारे आहे. गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या १० आदिवासींच्या कुटुंबाना भेटण्यापासून प्रियंका गांधींना रोखणे हा सत्तेचा दुरुपयोग आहे. यातून हे सिध्द होते की, उत्तर प्रदेशमध्ये कशाप्रकारे असुरक्षिततेचे वातावरण बनत चालले आहे.' 

बाबरी मशीद प्रकरणी ९ महिन्यांत निकाल द्या-सर्वोच्च न्यायालय

सोनभद्र गोळीबारातील जखमींना भेटण्यासाठी प्रियंका गांधी वाराणसी येथील बीएचयू ट्रॉमा सेंटर येथे गेल्या होत्या. जखमींची भेट घेतल्यानंतर त्या सोनभद्र येथील पीडितांच्या भेटीसाठी रवाना झाल्या. मात्र मीर्झापूर -नारायणपूर चौकीजवळ पोलिसांनी त्यांच्या ताफ्याला अडवले. पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते धरणे आंदोलनासाठी बसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रियंका गांधी यांना मिर्झापूर येथील गेस्ट हाऊसवर नेण्यात आले आहे. या घटनेनंतर काँग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.

भाजप किती दिवस सत्तेवर राहते हे आम्ही पण बघू - कुमारस्वामी