पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी मागितली ५० कर्जबुडव्यांची नावे, अध्यक्षांबद्दल व्यक्त केली नाराजी

राहुल गांधी

देशातील टॉप ५० कर्जबुडव्यांची नावे जाहीर करण्यावरून सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सत्ताधारी भाजपच्या सदस्यांमध्ये गदारोळ झाला. या प्रकरणी पुरवणी प्रश्न मांडू देत नसल्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या ३७ वर; आणखी ४ नवे रुग्ण

राहुल गांधी म्हणाले, देशातील टॉप ५० कर्जबुडव्यांची नावे द्यावीत, असा साधा प्रश्न मी विचारला होता. पण मला त्या प्रश्नांचे नेमके उत्तर मिळाले नाही. त्यातही मला सर्वाधिक दुःख याचे वाटले की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मला पुरवणी प्रश्नही विचारू दिला नाही. पुरवणी प्रश्न विचारणे हा प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे.
कर्जबुडव्यांची नावे द्यावीत आणि त्यांच्याकडून बुडवलेले कर्ज वसुल करण्यासाठी सरकारने काय मेहनत घेतली याची माहिती द्यावी, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता. त्यांचा प्रश्न लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासासाठी नोंदविण्यात आला होता. या प्रश्नाचा क्रमांक ३०५ होता. 

राहुल गांधी म्हणाले, देशातील बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्यांना पुन्हा भारतात आणले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. मी तर केवळ त्यांची नावे विचारली होती. पण मला समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.

कोरोनामुळे दक्षता, तुळजाभवानीचे मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

राहुल गांधींच्या या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी लोकसभेत अनुराग ठाकूर उभे राहिले होते. पण या प्रश्नावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी केली. यावरून त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. पण अर्थराज्यमंत्री उत्तर देऊ शकतात, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. अनुराग ठाकूर यांनी आपल्या उत्तरात ती नावे वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे सांगितले.