पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील गरीब कधी जागे होणार म्हणत राहुल गांधींची पुन्हा सरकारवर टीका

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार तांदळाच्या माध्यमातून सॅनिटायझर्स तयार करणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. त्याचा आधार घेऊन केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

'महाराष्ट्रात साधूंची भगवी वस्त्र रक्ताने भिजली याचे राजकारण करु नका'

राहुल गांधी यांनी हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंदुस्थानमधील गरीब जनता कधी जागी होणार? तुम्ही उपाशी पोटी मरताहात आणि तिकडे ते तुमच्या हिश्श्याचा तांदूळ घेऊन सॅनिटायझर्स तयार करणार आहेत. याच सॅनिटायझर्सच्या माध्यमातून देशातील श्रीमंताचे हात साफ केले जाणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

देशात २४ तासांत कोरोनाचे १३३६ नवे रुग्ण, ४७ जणांचा मृत्यू

गेल्याच आठवड्यात त्यांनी लॉकडाऊन हा काही कोरोना विषाणूवर उपाय नसल्याचे म्हटले होते. लॉकडाऊन हा केवळ तात्पुरता पर्याय आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण रोखले जाऊ शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. जेव्हा सरकार लॉकडाऊन मागे घेईल आणि पुन्हा सगळे आपल्या घराबाहेर पडतील. त्यावेळी हा विषाणू पुन्हा एकदा संक्रमणाचे काम सुरू करेल, असे सांगून ते म्हणाले, आपल्याला या विषयावर आत्ताच एक धोरण निश्चित केले पाहिजे. आपल्याला चाचणी करण्याची सुविधा वेगाने वाढविली पाहिजे. कोरोनासाठी खास रुग्णालये वेगाने तयार केली पाहिजेत. चाचणी हे सर्वात मोठे अस्त्र आहे. येत्या काळात त्याचाच आपल्याला वापर करावा लागेल, असे त्यांनी म्हटले होते.