पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदींचे विचार एकसारखेच'

राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे एकाच विचारधारेवर विश्वास ठेवतात. त्यांचे विचार एकसारखेच आहेत, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सांगितले आहे. तसंच, मोदींमध्ये हे सांगण्याची हिंम्मत नाही की ते गोडसेंवर विश्वास ठेवतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये 'संविधान वाचवा मोर्चा' काढण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाचे ठरणारे पाच मुद्दे

राहुल गांधी यांनी पुढे असे सांगितले की, 'मी भारतीय आहे याचा पुरावा देण्याची मला गरज नाही. कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसंच, जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि नोकरीविषयी विचारता तेव्हा ते तुमचे लक्ष विचलीत करतात, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. सीएए आणि एनआरसीमुळे नोकरी मिळणार नाही. काश्मीर आणि आसामला जाळल्यामुळे आमच्या तरुणांना रोजगार मिळणार नाहीत, असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले.

महात्मा गांधी स्मृतिदिन: मोदींसह दिग्गजांकडून राजघाटावर श्रद्धांजली

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली वायनाडमध्ये संविधान वाचवा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा येथून झाली. दोन किलो मीटरपर्यंत पायी हा मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी यांच्यासोबत या मोर्चामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न