पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जम्मू-काश्मीर प्रकरणात पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याची गरज नाही'

राहुल गांधी

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. ट्विट करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. 'मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी मी असहमत आहे. मात्र जम्मू-काश्मीर हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही', असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कलम- ३७० प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जम्मू-काश्मीच्या मुद्द्यावरुन संतप्त होऊन राहुल गांधी यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार होत आहे. कारण त्याठिकाणी जगभरात दहशतवादाचा प्रमुख समर्थक मानल्या जाणार्‍या पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे आणि त्याचे समर्थन सुध्दा केले जात आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rahul gandhi says kashmir is india internal issue and there is no room for pakistan to interfere in it