पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वायनाडमधून जिंकल्यावर विचारही बदलला का? जावडेकरांचा राहुल गांधींना सवाल

राहुल गांधी आणि प्रकाश जावडेकर

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानला लक्ष्य केल्यानंतर भाजपने पत्रकार परिषद बोलवून राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी मनापासून नव्हे तर परिस्थिती पाहून ही भूमिका घेतली आहे, असे केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जनेतेचा आक्रोश पाहून त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. त्यांच्या वक्तव्याचा पाकिस्तानने फायदा उठवला असे सांगत राहुल गांधी आणि काँग्रेसने देशाची माफी मागायला हवी, असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. वायनाडामधून विजय मिळवल्यानंतर विचारही बदलला का? असा प्रश्न उपस्थित करत जावडेकरांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. जावडेकरांच्या या प्रश्नामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. 

'जम्मू-काश्मीर प्रकरणात पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याची गरज नाही'

राहुल गांधी यांच्या विधानाचा दाखला देत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असल्याची याचिका दाखल केली होती, याचा उल्लेखही यावेळी जावडेकरांनी केला. ज्या काँग्रेसने आणीबाणी लागू केली ते आम्हाला निर्बंधाबद्दल सांगत आहेत. काश्मीरमधील जनतेला केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कलम ३७० हटवल्यामुळे या परदेशात विकासाला चालना मिळेल. देशातील लोककल्याण योजना लागू होतील, असे ते म्हणाले. 

'भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवू'

राहुल गांधी यांच्या काश्मीर दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जावडेकर म्हणाले की, राहुल गांधी काश्मीर दौऱ्याला का गेले होते? त्यांनी यासंदर्भात परवानगी घेतली होती का? असे प्रश्न उपस्थित करत काश्मीरमधील जनतेला भडकवण्याच्या उद्देशानेच राहुल गांधी काश्मीर दौऱ्याला गेले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: rahul gandhi says kashmir is india internal issue-and there is no room for pakistan to interfere BJP Leader Prakash Javdekar Target Congress And Rahul Gandi