पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगात भारताची ओळख 'रेप कॅपिटल' अशी झालीय : राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देशातील महिला अत्याचाराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शनिवारी वायनाडमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची ओळख ही जगातील रेप कॅपिटल अशी झाली आहे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. भाजपचे नेते आणि माजी आमदार कुलदीप सेंगर प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का बाळगून आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

हैदराबाद एनकाऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

राहुल गांधी म्हणाले की, ' जगात भारताची ओळख ही रेप कॅपिटल अशी होत आहे. भारत महिलांना सुरक्षा का देऊ शकत नाही, असा प्रश्न इतर देशांना पडला आहे. भाजपचा एक आमदारचे बलात्कार प्रकरणात नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर भाष्य करायला तयार नाहीत. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या घडीला देशात अराजकता माजली आहे.  

Video : आदर राखून कोहलीनं पुरा केला हिशोबाचा फेरा

बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अल्पसंख्याकांवर अन्याय होताना पाहायला मिळते. देशात द्वेशाची भावना निर्माण केली जात आहे. हे सर्व हिंसेचे समर्थन करणारा देशाचे नेतृत्व करत असल्यामुळे घडत आहे, असे सांगत त्यांनी मोदींवर नाव न घेता निशाणा साधला.