राफेल विमाने खरेदी व्यवहारामध्ये गैर प्रकाराबद्दलच्या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या निकालामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला असताना राहुल गांधी हा मुद्दा आणखी नव्याने उपस्थित करण्याचे संकेत दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
राफेल विमान खरेदी : फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जोसेफ यांनी राफेल प्रकरणातील चौकशीसंदर्भात नवीन दरवाजे उघडल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हायला हवी असा उल्लेखही राहुल गांधी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करुन व्हायला हवी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
... यापुढे जपून बोला, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले
राफेल लढाऊ विमाने फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून खरेदी करण्यात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा निर्वाळा देणारा आपला आधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवला. न्यायालयाच्या या निकालासंदर्भात राहुल गांधी यांनी सहमती दर्शवली. मात्र तपास संस्था स्वतंत्रपण या प्रकरणाचा तपास करु शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांची ही भूमिका राफेल प्रकरणात नव्याने मुद्दे उपस्थित करण्याचे संकेत देणारी अशीच आहे.