पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्यांना भाजपात सन्मान मिळणार नाहीः राहुल गांधी

राहुल गांधी (ANI)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी आपले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी आपली विचारधारा खिशात ठेवली आहे. परंतु, त्यांना लवकरच याची जाणीव होईल की, त्यांनी काय केले आहे. भाजपत त्यांना सन्मान मिळणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  

राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य यांच्याबरोबरील आपल्या मैत्रीची आठवण सांगताना म्हटले की, मी त्यांची विचारधारा चांगल्या पद्धतीने जाणतो. परंतु, त्यांनी राजकीय भविष्यासाठी विचारधारेचा त्याग केला आहे. ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप-आरएसएस आहे. मी ज्योतिरादित्य यांची विचारधारा जाणतो. ते महाविद्यालयातही माझ्याबरोबर होते. मी त्यांना चांगला ओळखतो. 

राजकीय भविष्यासाठी विचारधारेला तिलांजली देण्याचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, ते आपल्या राजकीय भविष्याबाबत चिंतेत होते. त्यांनी आपली विचारधारा सोडली आणि आरएसएसबरोबर ते गेले. त्यांनी आपली विचारधारा आपल्या खिशात घातली आहे. लवकरच त्यांना जाणीव होईल की, त्यांनी काय केले आहे. ते आपल्या राजकीय भवितव्याबाबत घाबरले होते. 

राहुल गांधी वारंवार आपल्या मैत्रीचा उल्लेख करत होते. ते म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदेंच्या मनात एक आणि तोंडावर काही वेगळेच आहे. वास्तविकता ही आहे की, त्यांना तिथे (भाजप) सन्मान मिळणार नाही. कारण ते तिथे संतुष्ट राहणार नाहीत. याची त्यांना नंतर जाणीव होईल. मी दिर्घ काळापासून त्यांचा मित्र आहे. 

आपल्या कोअर टीमच्या सदस्यांना राज्यसभेचे तिकीट दिले जात नसल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, मी काँग्रेस अध्यक्ष नाही. मी राज्यसभेच्या उमेदवारांचे निर्णय घेत नाही. मी देशातील युवकांना अर्थव्यवस्थेबाबत सांगत आहे. माझ्या टीममध्ये कोण आहे. माझ्या टीममध्ये कोणीही नाही. याचा काहीच अर्थ नाही.