पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी मोदींकडून इतर मुद्द्यांचा वापर'

राहुल गांधी

देशापुढील मुख्य प्रश्नांपासून देशातील नागरिकांचे लक्ष वळविण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेस, पंडीत जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान असे मुद्दे पुढे केले जात आहेत, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणावर गुरुवारी टीका केली.

लोकसभेतील नरेंद्र मोदींच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे...

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडलेल्या आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. या उत्तरात त्यांनी जुन्या काळातील काँग्रेस सरकारच्या काराभाराचे वाभाडे काढले. त्याचवेळी सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे काही संदर्भही दिले. या भाषणावेळी राहुल गांधी लोकसभेत उपस्थित होते. आपल्या भाषणात राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्यावरही नरेंद्र मोदींनी टीका केली. 

शीना बोरा प्रकरण : पीटर मुखर्जींनां जामीन मंजूर

नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, देशातील मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविणे हेच नरेंद्र मोदींचे काम आहे. ते काँग्रेस, जवाहरलाल नेहरू, पाकिस्तान याबद्दल बोलतात. पण मुख्य प्रश्नांबद्दल काहीच बोलत नाहीत. बेरोजगारी आणि नोकऱ्याच नसणे हा सध्या देशापुढील प्रमुख प्रश्न आहे. याबद्दल आम्ही खूप वेळा पंतप्रधानांना प्रश्न विचारले. पण ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. याआधी अर्थमंत्र्यांनीही लोकसभेत भलेमोठे भाषण दिले. पण त्यांनी सुद्धा महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल काहीच भाष्य केले नाही, याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले.