पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: पुरावे देत राहुल गांधी म्हणाले, यूपीत खूप चुकीचं झालं

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्याविरोधात (सीएए) झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (एनएचआरसी) धाव घेत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. आयोगाच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, स्वतः सरकारच जनतेवर अत्याचार करेल असा भारत देश बनू शकत नाही. आम्ही मानवाधिकार आयोगाकडे पुरावे सादर केले आहेत. याची चौकशी केली तर उत्तर प्रदेश सरकारने किती चुकीचे केले आहे, हे समोर येईल.

मोदी आता शाहीन बागेत का जात नाहीतः काँग्रेस

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आयोग मानवाधिकाराचे संरक्षण करणारी सक्षम संस्था आहे. आम्ही पुरावे सादर केले आहेत. जर आयोगाने खोलात जाऊन याचा तपास केला तर यूपीमध्ये जे काही झाले आहे, ते चुकीचे झाले या मताशी तेही सहमत होतील. 

CAA विरोधातील प्रस्ताव मंजूर करणारे प.बंगाल चौथे राज्य

काँग्रेसने यूपी पोलिसांबरोबर काम करणाऱ्या पोलिस मित्रांवरही आरोप केला आहे. राहुल म्हणाले की, देशभरात हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहे. लोकांवर अत्याचार करण्यासाठी पोलिस मित्रांची भरती करत आहेत. जे काही होत आहे, ते देश आणि संविधानाच्या मूळ भावनेविरोधात आहे.

भाजप घाणेरडे राजकारण करतेय; अरविंद केजरीवाल यांचा आरोप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rahul gandhi priyanka gandhi at national human rights commission over police brutalities against anti caa protestors in up