लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे भलेही राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ इच्छित असले तरी पक्षाच्या कार्यकारिणीने तो नामंजूर केला आहे. दरम्यान, राहुल यांना राजीनामा देण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी भावनिक आवाहन केले आहे. जर राहुल यांनी राजीनामा दिला तर दक्षिणेत पक्षाचे कार्यकर्ते आत्महत्या करतील, असे त्यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांच्या या वक्तव्यानंतर केरळमधून राहुल यांच्या समर्थनात नेत्यांची वक्तव्ये समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला - रणदीप सुर्जेवाला
केरळमधील काँग्रेस नेत्यांनी पराभवानंतर राजीनामा देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला म्हणाले की, भूतकाळातही काँग्रेसचा असा पराभव झाला असून पक्ष त्यातून पुन्हा उभारला आहे. राहुल गांधींना राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांचा राजीनामा हा तोडगा नाही. पक्षाला आणखी मजबूत करण्याची गरज आहे आणि लोकांचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राहुल यांनीच पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे.
पंतप्रधानांना इतकं खोटं सांगतंय कोण, चिदंबरम यांचा सवाल
दरम्यान, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी या आकडेवारीत सुधारणा होत पक्ष ५२ जागेपर्यंत आला. परंतु, १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर ४ जागांवर काँग्रेसच्या घटक पक्षांना यश आले.