पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींचा मोठा प्लॅन

राहुल गांधी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नक्की आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात होता. पक्षाच्या तिकीट वाटपात, आघाडीच्या चर्चेत राहुल गांधी कुठेच सक्रीय असल्याचे दिसले नाहीत. पण आता राहुल गांधी प्रचारामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर असणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी १० ते १९ ऑक्टोबर या कालावधीत रोड शो, प्रचारसभा घेणार आहेत. 

दीपाली सय्यद शिवसेनेत; कळव्यातून लढवणार निवडणूक

महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत आहे. एकदा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल.

काँग्रेसने नाना पटोलेंना साकोलीमधून दिली उमेदवारी

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात फिरून प्रचारसभा घेतल्या होत्या. पण निवडणुकीत यश न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षाच्या कार्यक्रमात फारसे सक्रीय दिसले नाहीत. पण आता विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी काँग्रेसचे स्टार प्रचारक असणार आहेत. ते या दोन्ही राज्यांमध्ये रोड शो करणार आहेत. त्याचबरोबर जाहीरसभाही घेणार आहेत.