पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींना तिरंग्यापेक्षा पाकिस्तानचीच जास्त काळजी - स्मृती इराणी

स्मृती इराणी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना देशाच्या तिरंग्यापेक्षा पाकिस्तानचीच जास्त काळजी असल्याची टीका केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर प्रश्नावरून केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी ही टीका केली.

५ ते १० लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात दिलासा मिळण्याची शक्यता

पाकिस्तानला राहुल गांधी यांच्याकडून पाठिंबा मिळत असल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. याआधीही असे घडले आहे. खरंतर हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की या देशातील एक नेता स्वतःच्या देशाच्या राष्ट्रध्वजापेक्षा शत्रूराष्ट्राचा जास्त विचार करतो, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे. स्मृती इराणी आपल्या अमेठी मतदारसंघात आल्या असताना त्यांनी ही टीका केली.

उत्तर प्रदेशचे मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली. केवळ उत्तर प्रदेश हे एक राज्य पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी पुरेसे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तान नव्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी सज्ज

दरम्यान, राहुल गांधी यांनी बुधवारी पाकिस्तानवर टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणण्यामागे पाकिस्तानच असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पण आधीच्या वक्तव्यावरून स्वतःला सावरण्यासाठीच राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर टीका केली असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.