देशातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून, त्यांच्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही, असे काँग्रेसचे राजीनामा दिलेले अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करीत सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले.
लग्नसोहळ्यावर काळाचा घाला; भरधाव ट्रकने ८ जणांना चिरडले
राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, देशातील शेतकरी विविध समस्यांशी लढतो आहे. याकडे मी सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो. बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावले जात आहे. यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. अशा पद्धतीने बँकांनी शेतकऱ्यांना धमकावू नये, असे आदेश सरकारने दिले पाहिजेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
वायनाड या आपल्या मतदारसंघात कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेल्या एका शेतकऱ्यांनी बुधवारी आत्महत्या केली. कर्ज चुकवले नाही म्हणून तेथील आठ हजार शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस पाठवली आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे. यामुळेच घाबरून शेतकरी आत्महत्या करतात, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
VIDEO : तीन वर्षांचा मुलगा मुंबईत नाल्यात पडला, शोध सुरू
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडणूक जिंकली होती. पण त्याचवेळी त्यांना त्यांच्या पारंपरिक अमेठी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता.
Rahul Gandhi in Lok Sabha: The farmers in the country are suffering. I would like to draw the govt's attention towards it. No concrete steps were taken in the Union Budget to provide relief to the farmers. (file pic) pic.twitter.com/ZkELSV6yzH
— ANI (@ANI) July 11, 2019