पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि...

राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळपासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी विविध स्थळांना भेट दिली. गुजरातची विकास वाहिनी नर्मदा नदीचे पूजनही त्यांनी केले. त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एक व्हिडिओही त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसारित केला. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी दुपारी राहुल गांधी यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांना चांगले आरोग्य लाभू दे आणि ते कायम आनंदात राहू दे. त्यांच्या या ट्विटला अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारो लोकांनी लाईक केले आहे.

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी यांनी सोडली नव्हती. राफेल विमाने खरेदी प्रकरणावरून राहुल गांधी यांनी कायमच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पण वाढदिवसानिमित्त राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलला मेन्शनही केले आहे.

लाचारी स्वीकारणाऱ्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवारांचे वक्तव्य

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. सध्या सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.