पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सारे मोदी चोर' विधानासंदर्भातील खटल्यात राहुल गांधींना दिलासा

राहुल गांधी

'सारे मोदी चोर हैं' या विधानासंदर्भातील प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. पुढचा आदेश देईपर्यंत राहुल गांधी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, असे न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये म्हटले आहे. 

कोणते गुन्हे मागे घेतले?, प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला सवाल

लोकसभेच्या प्रचारावेळी 'सारे मोदी चोर हैं' या वक्तव्यावरुन राहुल गांधी अडचणीत सापडले होते. याप्रकरणात रांचीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरु आहे. स्थानिक न्यायालयाने याप्रकरणात राहुल गांधींना नोटीस धाडून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. याविरोधात राहुल गांधींनी झारखंडच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. 

'महिला नेतृत्वाच्या जागेसाठी अमृता फडणवीस यांची धडपड

राहुल गांधी यांना दिलासा देताना कोर्टाने त्यांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील प्रदीप मोदी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी यांनी  'सारे मोदी चोर हैं' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रदीप मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.