पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तोपर्यंत राहुल गांधींच काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार!

सोनिया गांधी आणि राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

राहुल गांधी यांनी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा केली असली तरी काँग्रेस कार्यकारणी जोपर्यंत राहुल गांधींचा राजीनामा स्वीकारत नाही तोपर्यंत तेच अध्यक्षपदी राहतील, असे वृत्त एएनआयने काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

आता राहुल गांधी फक्त खासदार! ट्विटर प्रोफाइलमध्ये केला बदल

राहुल गांधी यांनी चार पानी खुल्या पत्राच्या माध्यमातून राजीनाम्याचा निर्णय सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  मोतीलाल व्होरा यांच्याकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद दिले जाण्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. जोपर्यंत पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड केली जात नाही. तोपर्यंत मोतीलाल व्होरा हे हंगामी अध्यक्षपदी असतील, असे वृत्त समोर आले होते. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याचे एएनआयने स्पष्ट केले आहे. काँग्रेस कार्यकारणी जोपर्यंत राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारत नाही, तोपर्यंत तेच अध्यक्षपदी कायम राहतील.

९० वर्षीय मोतीलाल व्होरा काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकार राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राहुल गांधींनी आपण भूमिकेवर ठाम राहिले. काँग्रेस घराण्याशिवाय कोणत्या चेहऱ्याला संधी मिळावी, असे स्पष्ट करत प्रियांका गांधींच्या नावाचा विचारही करु नये, असे काँग्रेस नेत्यांना यापूर्वीच  सांगितले होते. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: rahul gandhi continues to be congress president till time congress working committee accepts his resignation