पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

राहुल गांधी

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र टीका केली आहे. लोकसभेमध्ये या विषयावर मंगळवारी चर्चा सुरू असतानाच राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. कलम ३७० रद्द करणे म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे आणि याचे राष्ट्रीय सुरक्षेवर गंभीर परिणाम होतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काश्मीरसंदर्भात अधिररंजन चौधरींच्या वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी

ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, आपल्या देशातील नागरिकांनी देश घडविला आहे. तो केवळ जमिनीच्या तुकड्यांमुळे तयार झालेला नाही. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अटकेत ठेवणे आणि घटनेतील कलमांचे उल्लंघन करणे योग्य नाही. 

पुणे - बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद, कोल्हापूरजवळ पुलावर पाणी

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंगळवार लोकसभेत मांडण्यात आले आहे. लोकसभेत सरकारकडे बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. नव्या रचनेनुसार, जम्मू-काश्मिरचे विभाजन करण्यात येणार असून, लडाख हा नवा केंद्रशासित प्रदेश करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरही केंद्रशासित प्रदेश होणार आहे. त्याचबरोबर ३७० कलम रद्द करण्यात आले आहे.