पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात १० लाख व्यक्तींमागे केवळ १४९ टेस्ट, राहुल गांधींनी केला दावा

राहुल गांधी

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे देशातील वातावरणही दुषित झाले आहे. सरकार आणि प्रशासनासमोर कोरोनाचा सामना करण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोणतीही लस उपलब्ध नसलेल्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय घेतले जात आहेत. आरोग्यविषयक सेवेसाठी आवश्यक उपकरणे पुरवण्यासाठी आम्ही सर्वोत्परी प्रयत्न करु, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. 

 

 

...म्हणून मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलऐवजी ३ मे पर्यंत वाढवला?

मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी कोरोना विषाणूच्या चाचपणीसाठी आवश्यक त्या प्रमाणात चाचण्या होत नसल्याचा दावा करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात १० लाख लोकांमागे केवळ १४९  चाचण्या होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी इतर राष्ट्रांतील चाचणीचा संदर्भ देत हा आकडा वाढवण्याची गरज असल्याचा सल्ला सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, समूहाची तपासणी करणे हेच कोरोनाविरोधातील लढ्यातील प्रमुख अस्त्र आहे. पण सध्याच्या घडीला आपण खूप मागे आहोत.  

देशात २४ तासांत कोरोनाचे १२११ नवीन प्रकरणे, ३१ जणांचा मृत्यू

यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून कोरोना विषाणूमुळे देशाची वाटचालही आर्थिक संकटाच्या दिशेने होत असल्याचे म्हटले होते. या आर्थिक संकटाचा फायदा उठवत परदेशी कंपन्या देशातील कंपन्यांवर ताबा मिळवणार नाहीत, यावर केंद्र सरकारने लक्ष द्यावे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rahul Gandhi blames Narendra Modi government that India delayed purchase of testing kit of COVID 19