पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या प्रश्नावर उत्तर देण्याआधी मंत्र्यांच्या टिप्पणीमुळे लोकसभेत गदारोळ

हर्षवर्धन

लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केलेल्या  टिप्पणीमुळे सभागृहात गोंधळ झाला. विरोधी बाकांवरील काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन मंत्र्यांचे बोलणे थांबविण्याचा प्रयत्न केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळातच कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केले.

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी

राहुल गांधी यांनी शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासावेळी प्रश्न क्रमांक ८९ च्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला हर्षवर्धन उत्तर देणार होते. पण आपले उत्तर देण्यापूर्वी त्यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर उतरून केलेल्या टीकेचा निषेध नोंदविला. लोकसभा अध्यक्षांना विनंती करून त्यांनी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मला एक मुद्दा मांडायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असे सांगितले. हर्षवर्धन यांचे वक्तव्य समजल्यावर लगेचच काँग्रेसचे सदस्य जागेवर उभे राहून गोंधळ घालू लागले. त्यांच्यातील काही जण अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले आणि ते हर्षवर्धन यांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले. पण हा सगळा प्रकार बघताच लोकसभा अध्यक्षांनी लगेचच सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केले.

काहीतरी गडबड आहे, शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

देशातील बेरोजगार तरूण सहा महिन्यांनी नरेंद्र मोदींच्या पाठीत दांडक्यांनी मारतील, असा स्वरुपाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याचाच निषेध हर्षवर्धन यांनी नोंदविला. देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे वक्तव्य अशोभनीय असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनावेळी सांगितले.