पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामियात गोळीबार करणाऱ्यास पैसे कोणी दिले? राहुल गांधींचा सवाल

राहुल गांधी

जामिया मिलिया इस्लामिया येथे सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलनात गोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला कोणी पैसे पुरवले, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. 

संसद भवन परिसरात राहुल गांधी यांना गुरुवारी जामियामध्ये झालेल्या गोळीबाराबाबत विचारले असता, त्यांनी त्या मुलाला पैसे कोणी दिले, असा प्रश्न उपस्थित केला. 

विकासदर ६ ते ६.५ टक्के राहिल, आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज

जामिया मिलिया येथे गुरुवारी सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर एका अल्पवयीन मुलाने गोळीबार केला होता. यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. पोलिसांसमक्ष त्या मुलाने गोळीबार केला. त्याचबरोबर त्याने आंदोलकांनी 'ही घ्या आझादी' अशा घोषणा देत होता. गोळीबारानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्याला आज १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

NZ vs IND: सुपर ओव्हमध्ये टीम इंडिया पुन्हा ठरली सुपर हिट

या युवकाने काळ्या रंगाचा जॅकेट घातला होता आणि जामिया मिलिया इस्लामियाजवळ सीएएविरोधात आंदोलनादरम्यान त्याने एका विद्यार्थ्यावर गोळी झाडली होती. यात तो विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.