पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बोलण्यापासून रोखण्यासाठीच माझ्यावर मानहानीचे खटलेः राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी सकाळी मानहानीच्या एका खटल्याप्रकरणी सूरतमधील न्यायालयासमोर हजर झाले. दरम्यान, या खटल्याची सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता राहुल गांधींना ११ ऑक्टोबरला आणखी एका मानहानीच्या खटल्यासाठी अहमदाबाद येथील एका न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. मला शांत बसवण्यासाठी विरोधी पक्षाकडून हे खटले दाखल करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

कर्नाटकमधील कोलार येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद मोदींविरोधात विधान केले होते. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असते, असा सवाल त्यांनी सभेला उपस्थितीत असलेल्या लोकांना केला होता. यावरुनच त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सूरतला आलेल्या राहुल गांधींनी न्यायालयाल सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याचे उत्तर देण्यासाठी १० डिसेंबर तारीख दिली आहे. 

'चंपा'ला शरद पवारांशिवाय काहीच दिसत नाहीः अजित पवार

याबाबत टि्वट करताना राहुल गांधी म्हणाले की, मला शांत बसवण्यासाठी अधीर झालेल्या माझ्या राजकीय विरोधकांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेसाठी मी आज सूरतमध्ये आहे. मी काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेम आणि त्यांनी समर्थनासाठी मी आभार व्यक्त करतो.