पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण?, राहुल गांधी म्हणाले...

राहुल गांधी

आपला उत्तराधिकारी कोण असेल, याचा निर्णय मी नाही तर पक्ष घेईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा कार्यकारिणीने फेटाळला असला, तरी राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी राजीनाम्याचा निर्णय मागे घेणार की कायम राहणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काँग्रेस अध्यक्षपदावर तुमच्या नंतर कोण येईल, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आल्यावर त्याला उत्तर देताना ते म्हणाले, माझ्या पदावर कोण येईल, हे मी नाही तर माझा पक्ष ठरवेल. 

 

राफेलमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या मतावर मी आजही ठाम - राहुल गांधी

राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या मतावर मी आजही ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. या कार्यक्रमानंतर संसद भवनातून बाहेर येताना राहुल गांधी यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी वरील मत मांडले.